मुंबई : कोरोना व्हायरसची जगभरात दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाचा फटका सगळ्यांना पडत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देश लॉकडाऊन केले असून आता असंख्य कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' हा पर्याय दिला आहे. असं असताना अनेक लोक घरी राहून नेटफ्लिक्स (Netflix),ऍमेझॉन प्राईम (Amazon Prime) आणि यूट्यूबवर ऑनलाइन व्हिडिओ पाहून वेळ घालवत आहेत. पण ऑनलाईन ग्राहकांना कोरोनाचा चांगलाच फटका बसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑनलाईन स्ट्रीमिंग कंपनीने ग्राहकांना व्हिडिओ क्वालिटीमध्ये नाराज केलं आहे. आता या ऑनलाईन व्हिडिओजची क्वालिटी एचडीवरून कमी करून एसडीवर केली आहे. महत्वाचं म्हणजे लॉकडाऊनपर्यंत म्हणजे १४ एप्रिलपर्यंत हे बदल करण्यात येणार आहेत. 



कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनचा निर्णय घोषित करण्यात आला आहे. यामुळे इंटरनेटचा वापर जास्त केला जात आहे. इंटरनेटच्या वाढत्या वापराचा परिणाम नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरवर पडत आहे. यामुळे इंटरनेटचा स्पीड कमी झाला आहे. या तणावाला कमी करण्यासाठी कंपन्यांनी हाय डेफिनेशन म्हणजे HD व्हिडीओ क्वालिटी ही स्टँडर्ड डेफिनेशन (SD) पर्यंत केली आहे. आता युझर्स फक्त स्टँडर्ड डेफिनेशन म्हणजे SD व्हिडिओच पाहू शकणार आहेत. या व्हिडिओत अडचणी निर्माण होत आहेत. या व्हिडिओचा बिटरेट ४८० पीहून अधिक होणार नाही.